लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात एका विद्याथ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

विजय नांगरे (वय २१,रा. मोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने वसतिगृहाच्या अभ्यासिकेत पंख्याला गळफास लावून घेतल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात होता. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विजय हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.

या पूर्वी त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.