जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी वाहन चालकाकडे १० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी चाकण येथील वाहतूक पोलीस व त्याचा सहायक (वॉर्डन) अशा दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : विसर्जन मिरवणुकीला वेग ; पोलिसांकडून प्रयत्न सुरू

mumbai, Khar subway, bridge on the Khar subway , residents opposed proposed bridge, residents near khar, residents of khar subway, khar subway news, mumbai news,
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात

आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय ३२, पोलीस कॉन्स्टेबल, चाकण वाहतूक विभाग) आणि किशोर भगवान चौगुले (वय ४३, वॉर्डन) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २२ वर्षीय युवकाने या विभागाकडे तक्रार केली होती. चाकण वाहतूक विभागाने तक्रारदारांची दुचाकी ताब्यात घेतली होती. कारवाई न करता ती दुचाकी परत देण्यासाठी आरोपींनी १०,००० रुपये लाच मागितली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.