पुण्याच्या बावधनमध्ये डिन्स रेसिडेन्सीतील फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. जास्त पैशांचे अमिश दाखवून आरोपी सूर्यकांत पंडित देवरे तीन तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी तिन्ही तरुणींची सुटका केली आहे. आरोपी सूर्यकांत देवरे ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा >>> पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधान परिसरातील डिन्स रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट, क्रमांक- ३०२ तिसऱ्या मजल्यावर आरोपी सूर्यकांत पंडित देवरे हा तीन तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून खरंच त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो का याची खात्री केली. त्यानंतर छापा टाकून तीन तरुणींची वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका केली आहे. आरोपी सूर्यकांत याच्यावर भा.द.वी कलम.३७० (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ कलम ३,४,५ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.