पुणे : नाट्याभिनयाच्या दुसऱ्या वर्षी, १९७६ मध्ये कमानी थिएटरमध्ये ‘घाशीराम कोतवाल’ नाटक पाहण्याची संधी मिळाली. हे नाटक पाहून मी मंत्रमुग्ध झालोच, पण मोहन आगाशे माझे स्पर्धक असल्याची जाणीव झाल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी रविवारी दिली. तसेच डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार देऊन नियतीने मला बदला घेण्याची संधी दिली, अशी नर्मविनोदी टिप्पणीही खेर यांनी केली.

हेही वाचा >>> “बायकांना आता माझ्याबरोबर…” ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्याचा मोठा खुलासा

त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना खेर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी खेर बोलत होते. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी मानकरी प्रतापराव पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मृदुल घोष, सुदाम दिशोई, उमेंद्रा एम., निर्मलकुमार क्षेत्री या जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पुण्यात बोलताना खूप अवघडल्यासारखे होते असे सांगून खेर म्हणाले, की सभागृहातील प्रत्येकालाच पुण्यभूषण पुरस्कार मिळू शकतो. अस्वस्थ असतो त्यावेळी मी आवर्जून पुण्यात येतो. त्यामुळेच मी जमिनीवर राहतो.

हेही वाचा >>> “सहसा मी रडत नाही, पण…”, सुधा मूर्तींनी सांगितला किस्सा; म्हणाल्या, “आलिया भट्टचा अभिनय पाहून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही नेहमी भेटत नसलो तरी आमच्या मनात एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. आम्ही दोघांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यांनी सई परांजपे यांच्यासमवेत, तर मी सत्यजित रे यांच्याबरोबर काम केले. बालकलाकार असणे हा आमच्यातील समान दुवा आहे. मुख्य धारेतील आणि समांतर चित्रपट याचा उत्तम समतोल आगाशे यांनी साधल्याचे टागोर यांनी सांगितले. शास्त्र आणि कला हे माझे दोन पाय आहेत. वैद्यकशास्त्राने मला आजाराची माहिती दिली आणि चित्रपट-नाटकाने माणसांविषयी जाणून घ्यायला शिकवले. शास्त्राने विचार शिकवला. कलेने मला भावनांचा आदर करायला आणि समाजाभिमुख व्हायला शिकवले, अशी भावना डॉ. आगाशे यांनी व्यक्त केली.