लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अपघातग्रस्त परदेशी बनावटीची पोर्श मोटार परत मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्याबाबत २६ ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात अगरवाल कुटुंबीयांसह ससूनमधील डॉक्टरांविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले. मुलाचे आई, वडील, आजोबा तसेच ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह आतापयर्यंत अठरा जणांना पोलिसांनी अटक केली तसेच, अपघातग्रस्त पोर्श मोटारही जप्त केली.

आणखी वाचा-Video: पिंपरी-चिंचवडमधील देहूरोडवरील दुकानांना मध्यरात्री आग

या घटनेला तीन महिने उलटल्यानंतर मोटार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी नुकताच शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याबाबत न्यायालयाने पोलिसांनाम्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. अर्जावर २६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर सरकार पक्षाचे मत विचारात घेऊन न्यायालय निकाल देणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसा वाहतूक नियम आणि कायद्यांची माहिती देण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ( आरटीओ) अल्पवयीन मुलाला रस्ते सुरक्षा उपक्रमातर्गत नुकतेच प्रशिक्षण दिले. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात त्याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमात रस्त्यावर वाहन चालवण्याची सुरक्षितता, वाहन परवान्याचे महत्त्व, रस्त्यावरील चिन्हे आणि चिन्हांचा अर्थ, तसेच अन्य बाबींची देण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान अल्पवयीन मुलाला मैदानावर प्रशिक्षणही देण्यात आले.