पुणे : जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींमधील १७७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. ६७६ उमेदवारांनी ६८७ अर्ज दाखल केले आहेत.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC Live: हायकोर्टात का गेला नाहीत, सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला प्रश्न; एक आठवडा वेळ वाढवून देण्याची मागणी

शिरूर तालुक्यातील सहा, हवेली पाच, इंदापूर चार, तर पुरंदर आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १२ ते १९ जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार पहिले तीन दिवस केवळ सहा उमेदवारी दाखल झाले होते. तर शेवटच्या दिवशी २८३ उमेदवारांनी २९३ अर्ज दाखल केले आहे. शिरूर तालुक्यात २८९ उमेदवारांनी ३०० अर्ज दाखल केले आहेत. हवेलीत १७२ उमेदवारांनी १७२ अर्ज, इंदापूर १२८ अर्ज, बारामती ४७ आणि पुरंदर तालुक्यातून ४० अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने दिली.

SC Hearing on OBC Reservation Live : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट महत्वाची : उल्हास बापट, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (२० जुलै) होणार असून २२ जुलै हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी ५ ऑगस्टला होणार आहे, असेही ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.