scorecardresearch

पुणे शहरातील ‘हे’ १२ अतिमहत्त्वाचे रस्ते लवकरच सुशोभीत केले जाणार

शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे.

पुणे शहरातील ‘हे’ १२ अतिमहत्त्वाचे रस्ते लवकरच सुशोभीत केले जाणार
शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. (संग्रहीत छायाचित्र)

शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेले १२ रस्ते अतिमहत्त्वाचे म्हणून निश्चित केले आहेत. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर दरवर्षी मोठा खर्च केला जातो. त्यापैकी दुभाजक दुरुस्त, पेंटींंग थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग या कामासाठी निविदा मान्य करण्यात आली आहे. या बारा रस्त्यांपैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडीमशीन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज-सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मान्यता दिली. उर्वरित रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांची कृती समिती

क्षेत्रीय कार्यालयांसाठी मंजूर केलेली निविदा
नगर रस्ता – १.५८ कोटी

कोथरूड – ५५.९३ लाख

ढोले पाटील – ६५.८२ लाख

येरवडा कळस – ७४.९३ लाख

औंध बाणेर – ७४.४५ लाख

शिवाजीनगर-घोले रस्ता – ७५.५५ लाख

बिबवेवाडी – ४८.६० लाख

सिंहगड रस्ता -७६.८४

हेही वाचा >>> पुणे : उपाहारगृहाची थाळी घरपोहोच देण्याच्या आमिषाने पाच लाखांना गंडा ; सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा

या रस्त्यांचे होणार सुशोभीकरण
लक्ष्मी रस्ता -४१.६९ लाख

संगमवाडी रस्ता -३०.४८ लाख

नेहरू रस्ता – ३५.०६ लाख

खडीमशीन चौक ते येवलेवाडी – २६.२८ लाख

खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा – २६.९६ लाख

शंकरशेठ रस्ता – २८.२४ लाख

नगर रस्ता – २६.०६ लाख

स्वारगेट ते कात्रज सातारा रस्ता – २५.६९ लाख

बिबवेवाडी मुख्य रस्ता – २६.२३ लाख

बावधन मुख्य रस्ता – २७.६२ लाख

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या