पुणे : हाॅटेल व्यावसायिकाकडे दोन लाखांची खंडणी मागणारे गजाआड | Arrest demanding ransom of two lakhs from hotel businessman pune print news rbk 25 amy 95 | Loksatta

पुणे : हाॅटेल व्यावसायिकाकडे दोन लाखांची खंडणी मागणारे गजाआड

वारजे भागातील हॉटेल व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

crime news
( प्रातिनिधिक फोटो)

वारजे भागातील हॉटेल व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.सुभाष अशोक सहजराव (रा. वारजे माळवाडी) आणि बाळासाहेब हरीभाऊ लोणारे (रा. कुडजे ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरातील उद्योजक, व्यावसायिकांची नुकतीच बैठक घेतली. माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी बैठकीत केली होती. उद्योजक, व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले होते. वारजे माळवाडी भागातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या विरोधात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल करण्याची धमकी आरोपी सहजराव आणि लोणारे यांनी दिली हाेती. आरोपींनी हाॅटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत हाॅटेल व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

हेही वाचा >>>जगताप कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास तुमचा उमेदवार उभा करू नका; भाजपाकडून पत्राद्वारे विरोधकांना आवाहन

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाल सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे आदींनी शिवणे भागात सापळा लावून दोघांना पकडले. सहजराव आणि लोणारे यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 15:56 IST
Next Story
जगताप कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास तुमचा उमेदवार उभा करू नका; भाजपाकडून पत्राद्वारे विरोधकांना आवाहन