पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत | Arrested for allegedly assaulting a woman officer in the Regional Transport Office pune print news amy 95 | Loksatta

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत

बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करुन पसार झालेल्या एकाला अटक करण्यात आली.

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे(संग्रहित छायचित्र)

बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करुन पसार झालेल्या एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गेले दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता.

हेही वाचा >>>पुणे: आंतरतारकीय हवामानाचा शास्त्रज्ञांकडून वेध

पिंटू पूर्णचंद्र घोष (रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात बाइक टॅक्सी सेवेला बंदी आहे. घोष बेकायदा प्रवासी वाहतूक करत होता. विश्रांतवाडी परिसरात त्याला पकडण्यात आले. घोष याने सहायक मोटर वाहन निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी झटापट केली. झटपटीत महिला अधिकारी जखमी झाल्या. त्यानंतर तो पसार झाला. घोष याचा शोध घेण्यात येत होता. तो खडकवासला भागात असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड आणि पथकाने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:58 IST
Next Story
पुणे:बेकायदा सावकारी प्रकरणात एकाला अटक; व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही धमकी