करोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आठवडाभराचे साहित्य घेऊन ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पुणे शहरातील कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओ ऑफिस हा भाग पुढील आदेश येईपर्यंत सील राहणार आहे. त्यामुळे या काळात लागणारे जीवनावश्यक साहित्य नागरिकांनी आठवडाभरासाठी जमा करुन ठेवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत. या भागांमध्येच करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. भविष्यात इतर भागात रुग्ण आढळल्यास परिस्थिती पाहून ते देखील सील करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

जे भाग सील करण्यात येणार आहेत. त्यांमध्ये एकूण ३७ रुग्ण आढळून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.