पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये रोकड, मद्य, सोने-चांदीसह दागिने, अंमली पदार्थ आणि मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी इतर वस्तुंचा समावेश आहे.

पुणे, शिरूर आणि मावळ मतदार संघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्याच्या तयारीच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथक, तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी आतापर्यंत ४.३४ कोटी रुपयांची रोकड, १.६९ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने, ४.९ कोटी रुपयांचा मद्यसाठा, १.१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि २.७८ कोटी रुपयांचे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वाटप करण्यात येणारे साहित्य असा मिळून १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
senior citizen cheated, Varad Properties,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >>>साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

दरम्यान, राजकीय जाहिराती प्रमाणीकरण करणाऱ्या कक्षाकडून १०० पेक्षा जास्त जाहिरातींचे प्रमाणीकरण केले आहे. माध्यम कक्षाकडून ३८ समाजमाध्यमातील खात्यांवर विनापरवानगी जाहिरात केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत जाहिरात केल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.