बारामती : – महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे नितीन वाईन हे दारू विक्रीचे दुकान साठे नगर बारामती समोर जीवघेणे हल्ले, तसेच मारामारी , व दंगा झाल्याचे चित्रीकरण प्रसारमाध्यमावर प्रसारित झालेले होते. सदर मारामारी मध्ये नितीन वाईन दारू विक्री मधील व्यवस्थापक तसेच कामगार यांचा समावेश दिसून येत होता. या चित्रीकरणातील मारामारी करणारे युवक अक्षा काकडे उर्फ बागवान हा रजिस्टर वरील गुंड असून तो यापूर्वी पोलीस ठाणे अभिलेखावरून तडीपार झालेले आरोपी आहे. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी या चित्रीकरणच्या अनुषंगाने नितीन वाईनचे विक्री करणारे चालक तसेच मालक मारामारी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे इसमा विरुद्ध रीतसर फिर्याद देण्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये चर्चा केली असता फिर्याद दिली नाही. फिर्याद देण्यास नकार दिल्यावरून संबंधित गुंड लोकांच्या विरुद्ध त्यांचे मनात भीती असल्याने समाज माध्यमातून लोकांच्या मनात दहशत निर्माण झालेली असल्या कारणाने संबंधित गुंड वक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई होत नसल्याने, चुकीचा संदेश जात होता. त्याअन्वये सदर वाईन शॉप समोर बेकायदेशीर जमाव जमून दंगा होण्याची निश्चितपणे खात्री झालेली होती. तसेच त्या प्रकारची गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती.

त्यामुळे दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये प्राप्त अधिकारानुसार नितीन वाईन हे दारू विक्रीचे दुकान दोन आठवड्या करिता बंद ठेवण्याचे आदेश पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहेत.

बारामती मध्ये प्रथमता अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली असून या अन्वये बारामती शहरांमधील सर्व अस्थापना यांचे चालक-मालक यांना आश्वासित करण्यात येते की कोणत्याही गुन्हेगाराविरुद्ध भीती अथवा भय न बाळगता त्यांनी समोर येऊन त्याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदवावी अशा गुन्हेगारांविरुद्ध बारामती पोलीस स्टेशन कडून सक्त कारवाई करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील संपूर्ण कारवाई ही गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नाळे बारामती शहर यांनी केली आहे.