लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) यांनी प्रायोजित केलेल्या उमेदवारांनी यश मिळवले. त्यात बार्टीचे दहा, तर सारथीच्या १७ उमेदवार यशस्वी ठरले.
सारथीतर्फे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ३९ उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यात आले होते. त्यापैकी प्रतिक अनिल जरड (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर), सागर यशवंत खर्डे (अहमदनगर), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली), लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा), शिवम सुनील बुरघाटे (अमरावती), शिवहार चक्रधर मोरे (नांदेड), राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर), महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर) या उमेदवारांनी यश मिळवल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
आणखी वाचा-UPSC CSE Result 2022 : नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात आणि राज्यात मुलींचाच डंका
तर बार्टीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांपैकी अमित चंद्रभान उंदीरवाडे, सुमेध मिलिंद जाधव, सिद्धार्थ किशोर भांगे, विवेक विश्वनाथ सोनवणे, निखिल अनंत कांबळे, अभिजय विजय पगारे, तुषार दीपक पवार, दयानंद रमाकांत तेंडोलकर, वैशाली विलास घांड, निखिल प्रमोद कोरे या उमेदवारांची निवड झाल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.