लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कात्रज परिसरात परराज्याातील प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.

राजू नागनाथ कांबळे (वय २०), अथर्व रवींद्र अडसुळ (वय २०, दोघे रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी परराज्यातील एका तरुणाला कात्रज परिसरात पत्ता विचारण्याचा बहाण्याने लुटण्यात आले होते. तरुणाने चोरट्यांना विरोध केल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खिशातील साडेचार हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. पसार झालेल्या चोरट्यांचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून माग काढण्यात येत होता.

हेही वाचा… परराज्यातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस कर्मचारी अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी राजू कांबळे, रवींद्र अडसुळ आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे आदींनी ही कारवाई केली.