पिंपरी- चिंचवड : भिसे कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणात पाठपुरावा केला होता. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. याप्रकरणी डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, ‘त्या’ दोन चिमुकल्यांच दायित्व मंगेशकर कुटुंबीयांनी घ्यावं अशी मागणी पुन्हा एकदा अमित गोरखे यांनी केली आहे. या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई झालेली नाही. आमची मुख्य मागणी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई हीच होती. अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली आहे.

अमित गोरखे म्हणाले, डॉ. घैसास यांच्यावर बी.एन.एस कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमची पहिल्यापासून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई व्हावी हीच मागणी होती. या कारवाईनंतर कुठल्याही गरीब गर्भवती महिलेला उपचारा वाचून, पैशांअभावी थांबवणार नाही. याची काळजी आता रुग्णालये प्रशासन घेतील. आमचा हा लढा कुणालाही दुखावण्यासाठी नव्हता. गोरगरिबांवर योग्य उपचार व्हावा आणि निष्काळजीपणा होऊ नये यासाठी होता. या प्रकरणी जुजबी कलम लावलेले नाही. अभ्यास करून कलम लावलेल आहे. अखेर या प्रकरणात भिसे कुटुंबाला न्याय मिळाला आहे.