पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलीस ठाण्याच्या आवारातील १९८६ पासून बेवारस आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सध्या भोसरी पोलीस घेत आहे. मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून त्यांची वाहने घेऊन जाण्याचे आवाहन भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी केले आहे. चारचाकी, तीनचाकी, दुचाकी अशा वाहनांचा यात समावेश आहे. गेली अनेक वर्ष वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडून आहेत.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो वाहने धुळखात पडून आहेत. १९८६ पासून ते २०२० पर्यंतची वाहने आहेत. बेवारस आणि अपघातग्रस्त वाहनांचा यात समावेश आहे. ७०० ते ८०० वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सध्या भोसरी पोलीस घेत आहेत. गाडीच्या नंबरप्लेटवरून त्यांचा शोध लावला जात आहे.

हेही वाचा – पुणे: चेकवर बनावट सही करून पतीने काढले पत्नीच्या बँक खात्यातून लाखो रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात जप्त करण्यात आलेली वाहने किंवा अपघातग्रस्त, बेवारस वाहने, गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मूळ मालकांनी पोलीस ठाण्यात येऊन कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून आपली वाहने परत घेऊन जावीत, असे आवाहन भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी केले.