भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची खराडी भागात घडली. या प्रकरणी डंपरचालकास अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरत अण्णा देवकर (वय ४१, रा. येरवडा ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी डंपरचालक रोहिदास राजाराम गोरे (वय ३० रा. लोहगाव ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सीमा वळवी यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार भरत देवकर खराडी भागातून जात होते. त्या वेळी भरधाव डंपरने दुचाकीस्वार देवकर यांना धडक दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider dies after being hit by a dumper pune print news amy
First published on: 03-08-2022 at 16:32 IST