पुणे : कोथरुड भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांने कोथरुड, एरंडवणे तसेच हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीचे सहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.संतोष सुरेश यादव (वय ३८, रा. सिद्धीविनायक काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

यादवने कोथरुड, एरंडवणे, हिंजवडी भागातून दुचाकी चोरल्या होत्या. पौड रस्त्यावरील शास्त्रीनगर भागातून तो दुचाकीवरुन जात होता. त्या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्याला अडवले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवा -उडवीची उत्तरे दिली.चौकशीत यादवने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा : पुणे : जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजनहेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादव याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने दुचाकी चोरीचे सहा गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासहेब बडे, सहायक पोलीस निरीक्षक पी. व्ही. कुलकर्णी, अजिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड यांनी ही कारवाई केली.