पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती ही मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी रात्री तिने एका मोकळ्या खोलीत गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ती नैराश्यात होती, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती बंडगार्डन पोलीसांनी दिली आहे.