पुणे : मावळ विधानसभेमध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेवर दावा केल्यानंतर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसत आहे. ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सुनील शेळके म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच शंभर टक्के प्रामाणिक काम केलं. परंतु, त्याच्यावर कोणी शंका घेत असेल आणि आम्हाला जागा मिळावी म्हणून आग्रह करत असेल तर योग्य नाही. असे स्पष्ट मत सुनील शेळके यांनी व्यक्त केल आहे. पुढे ते म्हणाले, शेवटी महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

हेही वाचा…विश्लेषण: पुण्यात खडकवासला धरणाच्या बाबतीत नेमके काय घडले? धरणांतून विसर्ग कसा करतात?प्रीमियम स्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचा धर्म पाळायचा अस आम्ही ठरवलं आहे. मी भाजपच्या संघ आणि जनसंघातून वाढलेल्या नेता आहे. त्यामुळे मला पक्षाचा आदेश समजतो वेगळं काही घडलंच तर युतीचा धर्म पाळणे माझ्यासाठी क्रमप्राप्त असेल. अजित पवारांना कधीच सोडणार नाही. कारण, अजित पवारांनी मला काही कमी पडू दिलं नाही. जे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असा खोचक टोला बाळा भेगडे यांना सुनील शेळके यांनी लगावला. भाजपचा २ ऑगस्ट रोजी मावळमध्ये मेळावा होणार आहे. मला निमंत्रण दिल, तर मी त्या मेळाव्याला उपस्थित राहील. असे देखील शेळके आणि अधोरेखित केलं.