पुण्यात भवानी पेठेतील एका फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
समर्थ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील विशाल सोसायटीमधील ‘बी’ विंगच्या तिसर्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्या फ्लॅटमध्ये राहणार्या व्यक्तीची चौकशी सुरू केली.
हेही वाचा : उत्तर प्रदेश रासायनिक कारखाना स्फोट : मृतांचा आकडा १२ वर, चौकशीसाठी समितीची स्थापना
“पुणेकर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,” असे आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.