पुणे : निवृत्त लष्करी जवानाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने झालेल्या गोळीबारात १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला. धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली. याप्रकरणी जवानाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभय नितीन शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के (वय ४०, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन शिर्के लष्करातून निवृत्त झाले आहेत.

हेही वाचा >>> घोरपडे पेठेत जुन्या वाड्यात आग; पाच घरे, दुकानाला झळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या ते सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी रिव्हॉल्वर कपाटातील एका पिशवीत ठेवली हाेती. रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. शिर्के यांचा मुलगा अभय एका शाळेत सातवीत आहे. मंगळवारी दुपारी तो घरात होता. दुपारी सव्वातीनच्या सुमारास अभयने कपाट उघडले. रिव्हाॅल्वर ठेवलेल्या पिशवीला धक्का लागला. पिशवी जमीनीवर पडली. रिव्हॉल्वरचा चापावर दाब पडला आणि गोळीबार झाला. रिव्हॉल्वरमधून सुटलेली एक गोळी अभयच्या पायातून आरपार गेली. त्यावेळी अभयची आई आणि लहान भाऊ घरात होते. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचे वडील निवृत्त जवान नितीन शिर्के यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.