पिंपरी : बैलगाडा शर्यत आणि शेती-माती-संस्कृतीची नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीमध्ये ‘बैलगाडा शर्यतीचे शिल्प’ साकारण्यात येत आहे. शिल्पाचे काम प्रगतिपथावर असून, बैलगाडा शर्यतप्रेमी आणि नागरिकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे.

हेही वाचा >>> महापालिका मालामाल…पिंपरी- चिंचवडकरांनी भरला कोट्यवधींचा कर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसरीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि भोसरी गावजत्रा मैदान परिसरात ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येत आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भोसरीतील गावजत्रा मैदान येथे महाराष्ट्र संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेला परंपरागत बैलगाडा घाट आहे. महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत यासह कुस्तीसारख्या मर्दानी खेळाबाबत नव्या पिढीत जनजागृती व्हावी. आपली शेती-माती आणि संस्कृतीबाबत अभिमान निर्माण व्हावा याकरिता या रस्त्याच्या सुशोभीकरणात विविध शिल्प उभारण्यात येणार आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी राज्यव्यापी चळवळ उभी केली होती. राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. आता बैलागाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गाडामालक, बैलगाडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला. आमदार महेश लांडगे म्हणाले, की महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत, कुस्ती, कबड्डी, योगमुद्रा अशा विविध शिल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती आणि विधायक संदेश जाईल. या संकल्पनेतून भोसरी गावजत्रा मैदान परिसर, तसेच स्मशानभूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे काम करताना सुशोभीकरण करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.