दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापिकेच्या नावाने समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राध्यापिकेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले विद्यार्थी मुंबईत तसेच चाकणमधील आहेत.

दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार एका महाविद्यालयात प्राध्यापिका असून दोन विद्यार्थ्यांनी प्राध्यापक महिलेच्या नावे समाजमाध्यमावर बनावट खाते उघडले. बनावट खात्यावर प्राध्यापक महिलेबाबत बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. प्राध्यापक महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. प्राध्यापक महिला तसेच शैक्षणिक संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत