पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचा माजी उपाध्यक्ष शंतनू कुकडे याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली.त्या तपासात आरोपी शंतनू कुकडे आणि अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार  झाल्याची माहीती समोर आली.तर या प्रकरणी दीपक मानकर यांनी पोलिसांकडे सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दीपक मानकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.अजित पवार यांच्या विश्वासू सहकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांना अटक करण्यात आली आहे.तर शंतनू कुकडे हे एका संस्थेच्या माध्यमांतून काम करीत होते.त्या संस्थेच्या आणि शंतनू कुकडे यांच्या खात्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्यामध्ये वेळोवेळी कोटय़वधी रूपयांचे व्यवहार झाल्याची माहिती शंतनू कुकडे प्रकरणात माहिती समोर आली.शंतनू कुकडे आणि दीपक मानकर या दोघांमध्ये जवळपास एक कोटीहून अधिक रूपयांची देवाण घेवाण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले.त्यानंतर पुणे पोलिसांनी दीपक मानकर यांच्याकडे या व्यवहाराबाबत माहिती मागितल्यावर आवश्यक ती कागदपत्र दीपक मानकर यांनी सादर केली.

पण ती सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे पोलिस तपासात समोर आले. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये दीपक मानकर यांच्याविरोधात बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या एकूणच प्रकरणी दीपक मानकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.