पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबत माधवी खंडाळकर यांनी सोशल मिडीयावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यावरून काल दुपारच्या सुमारास रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण प्रिया सुर्यवंशी, वैशाली पाटील,पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी या चौघांनी माधवी खंडाळकर या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली.त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रुपाली पाटील ठोंबरे यांना बहिणीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच,रुपाली पाटील ठोंबरे या खडक पोलीस स्टेशन येथे जाऊन,माधवी खंडाळकर आणि माझी बहिण यांच्यातील वाद कालच मिटला होता. तरी देखील तुम्ही माझ्या बहिणीवर कोणत्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.यासह अनेक प्रश्न पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारले.

त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या,मी काल बीडमध्ये असताना माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता.पण काही कालावधीनंतर तो व्हिडीओ माधवी खंडाळकर डिलीट केला.माधवी खंडाळकर, तिचा भाऊ आणि माझी बहीण यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या.पण त्या देखील दोन्ही बाजूने काल मागे घेण्यात आल्या होत्या.तो काल विषय संपला होता.मात्र आज अचानकपणे दुपारी ती महिला दुपारी येते आणि गुन्हा दाखल करते,त्यामध्ये माझं नाव असल्याच मला कळल.त्यामुळे मी स्वतःला अटक करून घेण्यास पोलीस स्टेशन येथे आले.त्यावेळी मला पोलीसकडून सांगण्यात आले की,माझ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.पण माझ्यावर गुन्हा दाखल करावा,माझ्या कुटुंबावर विनाकारण गुन्हा दाखल का केला आहे.काल तक्रार घेतली नाही.पण आज अचानकपणे गुन्हा दाखल कसा काय झाला असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांच प्रकरण पुढे आणल आहे. महिला आयोग या पदाचा रुपाली चाकणकर यांनी गैरवापर केला आहे.  त्या माध्यमातून माझ्या कुटुंबातील सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर करीत त्या पुढे म्हणाल्या, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.पण त्यांनी आजवर कोणत्याही प्रकारे न्याय देण्याच काम केल नाही.प्रत्येक वेळी महिलांना मानसिक त्रास देण्याच काम त्यांनी केल आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी सुरू केलेले वॉर रूपाली पाटील ठोंबरे संपवणार असल्याच सांगत रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांना इशारा दिल्याचे पाहण्यास मिळाले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेश अध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चुकीच्या पद्धतीने कारभार केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.