इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडून चोरटय़ांनी १६ लाखांची रोकड व १३८ तोळे सोने पळवून नेले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचा दरवाजा तोडला. आतमध्ये प्रवेश करून त्यांनी गॅस कटरनेच तिजोरी तोडली. त्यात ठेवलेली रोकड व सोने मिळून सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेचे इंदापूर तालुका संचालक अप्पासाहेब जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिठ्ठेवाड आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटय़ांच्या तपासासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.