पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. त्याबरोबरच आता प्रात्यक्षिक परीक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण संकेतस्थळावर भरताना शाळा, अंतर्गत परीक्षक यांनी योग्य गुण भरल्याची खात्री करून घ्यावी. गुण भरल्यानंतर त्यात सुधारणा करता येणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना सीबीएसईने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १२ जानेवारी या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात पाठविण्याची गरज नाही. सर्व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण परीक्षेच्या तारखांपासून एकाच वेळी भरले जाणार आहेत. संकेतस्थळावर गुण भरण्याचे करण्याचे काम संबंधित वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण केले जाईल.

हेही वाचा – तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या कामावर स्वत:च ठेवा वॉच

हेही वाचा – लोणावळा : ताम्हिणी घाटातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग रेस्क्यू पथकाकडून शोधमोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक शाळेत प्रात्यक्षिक परीक्षा आणि विशिष्ट विषयांच्या प्रकल्प मूल्यमापनासाठी बाह्य परीक्षक सीबीएसईकडूनच नियुक्त केले जाणार असून, स्थानिक पातळीवर बाह्य परीक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची शाळांना परवानगी नाही. प्रात्यक्षिक परीक्षेनंतर शाळांना प्रत्येक बॅचचे विद्यार्थी, शिक्षक, अंतर्गत परीक्षक, बाह्य परीक्षक या सर्वांचे चेहरे स्पष्ट दिसतील असे छायाचित्र संकेतस्थळावर द्यावे लागणार आहे. त्यासह वेळ, दिनांक ही माहिती द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.