लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडाउनमधील सीसीटीव्ही प्रणाली बंद पडल्याची तक्रार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी सोमवारी (दि. १३ मे) केली होती. मात्र, इलेक्ट्रिशियन काम करत असल्याने एका सीसीटीव्हीची वायर निघाली होती. परंतु, संबंधित वेळेतील छायाचित्रीकरण हे उपलब्ध असून दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार कविती द्विवेदी यांनी दिली.

Maharashtra Farmers, Maharashtra Farmers Struggle as Sowing, Sowing Disrupted by Rain Break in Maharashtra, 5 percent of Average Sown, monsoon in Maharashtra,
पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या, राज्यात अवघा ५.६९ टक्के पेरण्या
pune 11 th admission, pcmc 11th admission, Students Prefer Commerce and Science in pune, Quota Admissions Open 18 to 21 June, 11th admissions, pune news, pimpri chinchwad news,
पुणे : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या शाखेला? तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…
Woman Suffers Heart Attack on Mumbai Kolhapur Mahalaxmi Express, woman Suffers Heart Attack in train, Railway Staff Save life in woman, Mumbai Kolhapur Mahalaxmi Express Railway Staff Save woman,
रेल्वेत प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा… मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना
Lonavala, Crowds in Lonavala for Rainy Season, Rainy Season trip , Police Implement Temporary Traffic Change in lonavala,
वर्षाविहारासाठी लोणावळ्यात गर्दी; वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल, बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक
Pune Metro Line 3, hinjewadi to shivajinagar route, Third Rail traction, Begin on 20 , Pune Metro Line 3 Electrification, puneri metro, pune metro news,
पुणेरी मेट्रोला गती! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर‘थर्ड रेल’ विद्युतीकरण कार्यान्वित होणार
Ramdas Athawale, claims,
महायुती : रामदास आठवलेंचा विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा; म्हणाले…
Juvenile Justice Board,
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पोलिसांकडून बाल न्याय मंडळाकडे सादर; काय आहे अहवालात?
Pune, college student,
पुणे : घोले रस्त्यावरील वसतिगृहाच्या लिफ्टमधून उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Praveen Madikhambe,
लोणी काळभोर भागातील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदार तडीपार

आणखी वाचा-पुणे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान!

द्विवेदी म्हणाल्या, कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशियन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे