लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन रस्त्यावरील ११० एकर संकुलात पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प (रेनवॉटर हार्वेस्टिंग) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत शास्त्रीय उपाययोजनांच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागात हरित क्षेत्र निर्माण करण्यात येणार आहे.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
Pune, Metro Line, Extensions, PMRDA, Mahametro, Clash, Project Responsibility,
पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा

डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन या स्वयंसेवी संस्थेचे सहाय घेण्यात येणार आहे. डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रकल्पाचे प्रबंधक सुनील भिडे, कार्यकारी अभियंता नीरज पूर्णपात्रे, कमिन्स इंडियाच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभागाच्या प्रमुख सौजन्या वेगुरू, पंकज कुलकर्णी, शिवदुर्गचे पंडित अतिवाडकर आदी या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे: कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थी थेट टाटा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी पात्र

कुंटे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीसह ११० एकरच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मीळ वनस्पतींचा समावेश असणारे बोटॅनिकल गार्डन आहे. दरवर्षी सरासरी ८०० मिमी पावसाचा अंदाज धरल्यास या परिसरात ३५ कोटी लीटरहून अधिक पाणी वाहून जाते. या प्रकल्पामुळे या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. मातीचे वाहून जाणे रोखण्यासाठी गवताची लागवड केली जाणार आहे. बोटॅनिकल गार्डनसह सर्व परिसरात दुर्मीळ वृक्ष लावण्यात येतील. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठे हरित क्षेत्र विकसित होऊन प्रदूषण, तापमान कमी होण्यास मदत होणार आहे.

पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात कमिन्स इंडिया फाउंडेशन सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत आहे. डीईएससारख्या ऐतिहासिक शिक्षण संस्थेबरोबर पाणी बचत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे हा भाग्याचा क्षण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत कमिन्सकडून केली जाईल. सुरुवातीला तीन वर्षांसाठी असलेला हा करार वाढवला जाईल. उत्तम नैसर्गिक अधिवास या ठिकाणी विकसित होऊन त्याचा लाभ संपूर्ण शहराच्या पर्यावरणासाठी होईल, असे वेगुरू यांनी सांगितले.

आणखी वाचा- पुण्यातील ३०० पथारी व्यवसायिकांचे परवाने रद्द, ‘हे’ कारण

गेली दोन वर्षे या प्रकल्पावर प्राथमिक काम सुरू आहे. हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. खुल्या विहिरी तयार करणे, परिसरातील १५ बोअरवेल मधील गाळ काढून त्या कार्यान्वित करणे, टेकडीवर चर खोदणे, खोल चर घेणे, गॅबियन स्टॅक्चर निर्माण करणे, शोषण खड्डे घेणे अशा शास्त्रीय उपाययोजना या प्रकल्पांतर्गत केल्या जाणार आहेत. त्यासाठी परिसर हरित करण्यासाठी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज भागणार आहे. त्याबरोबर प्रत्येक विभागाची गरज लक्षात घेऊन पाणी वापराचे ऑडिट, बॅलन्सशीट तयार केले जाईल, पाण्याचा गरजेनुसार वापर व्हावा यासाठी उपायोजना केल्या जातील, अशी माहिती भिडे यांनी दिली.

विविध किल्ल्यांवरील निसर्ग संवर्धन-संरक्षणासाठी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसर हिरवागार करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न केले जातील. या प्रकल्पामुळे या ठिकाणची पाण्याची गरज भागेल असा विश्वास अतिवाडकर यांनी व्यक्त केला.