पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.११) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान काही गाड्या रद्द राहतील आणि काही उशिरा धावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, शिवाजीनगरहून रद्द लोकल :

१) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल राहील.

३) शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६) पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७) शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा…शरद मोहोळच्या खून प्रकरणातील आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप…’ही’ धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती

लोणावळ्याहून रद्द लोकल :

१) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

३) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४) तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ‘राष्ट्रवादी’त श्रेयवादाची लढाई, विकासकामांचे उद्घाटन करण्यावरून वाद

उशिरा धावणाऱ्या गाड्या

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway mega block many trains will be cancelled and delayed between pune and lonavala route pune print news stj 05 psg
First published on: 10-02-2024 at 11:04 IST