राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी- चिंचवड नाट्य परिषदेच्या वतीने सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी ( १२ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर दामले यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीनंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा नाट्यप्रयोगही होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रवेशिका नाट्यगृहात उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.यासंदर्भात भोईर म्हणाले की, शहरवासीयांच्या वतीने हे मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीत दामले यांनी बहुमोल योगदान दिले आहे. त्यासाठी हा सत्कार सोहळा आहे.