चाकणमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या वडिलांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने तरुणाचा आणि त्याला मदत करणाऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना घडलीय. गरम लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण करून दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यात, मयत प्रियकराच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. बाळू हा आरोपी वीटभट्टी मालक मरगज यांच्याकडे कामाला होता. या प्रकरणी मयत तरुणाची पत्नी मुक्ता बाळू गावडे, वीटभट्टी मालक यांच्यासह एकूण नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बाळू गावडे याचा विवाह झालेला असून त्याला दोन मुलं आहेत. दरम्यान, बाळू करंजविहिरे येथील वीटभट्टीवर कामाला होता. मे महिन्यात वीटभट्टी मालकाच्या मुलीवर बाळूचं प्रेम जडलं. या २१ वर्षीय तरुणीने बाळूच्या प्रेमाला होकार देत त्याला साथ दिली. याची माहिती मित्र राहुलला होती. याच दरम्यान, १५ जुलै रोजी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. यात राहुल बाळूची मदत करत होता. स्वतः राहुलने या दोघांना खोपोली परिसरात दुचाकीवरून सोडले होते. परंतु, बाळू आणि मुलगी बेपत्ता असल्याने वीटभट्टी मालकाचा संशय बळावला आणि त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे यामध्ये राहुलही मुलीच्या वडिलांना मदत करत असल्याचं नाटक करत होता. १६ जुलै रोजी बाळू आणि २१ वर्षीय मुलीला शोधण्यात यश आले. त्यांना आरोपी यांच्या ‘हॉटेल माणुसकी’ येथे नेलं. तेव्हा बाळूचा मित्र राहुल याचं पितळ उघड पडलं आणि तोच त्या दोघांना मदत करत असल्याचं समोर आलं. बाळूसोबत राहुलला गरम लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे बाळूची पत्नी मुक्ता ही देखील यात सहभागी होती. तिने देखील मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. याच मारहाणीत राहुल आणि बाळूचा मृत्यू झाला आहे. २१ वर्षीय तरुणीलाही मारहाण करण्यात आली असून ती यामध्ये जखमी झाली आहे.

मृत्यू झाल्याचं पाहून तरुणीच्या वडिलांनी चाकण पोलिसांना फोन करून हॉटलेमध्ये दोघांचा मृतदेह असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, मृतदेह संशयास्पद वाटत असल्याने तरुणीच्या वडिलांची पोलिसांनी उलट तपासणी केली. तेव्हा, या प्रकरणामधील सत्य समोर आलं आणि २१ वर्षीय तरुणीच्या वडिलांसह एकूण ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दौऱ्यावर…

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील दौऱ्यावर असून ते आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट देणार आहेत. आयुक्तालयातील कॉन्फिरन्स हॉल च त्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. परंतु, त्यांचा दौरा सुरू असताना त्यांच्या मतदार संघाच्या शेजारीच दुहेरी खुनाची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakan 2 boys killed as girlfriends father beats them kjp scsg
First published on: 17-07-2021 at 14:01 IST