लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मंगळवारपासून (४ जुलै) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन या वेळेत एनडीए-पाषाण रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून एनडीए-पाषाण रस्त्यावर उड्डाणपुलाचा ढाचा (गर्डर) बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन यावेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. जड वाहने वगळून मोटार, अन्य वाहनांनी सातारा ते मुंबई महामार्गावरील वेदभवन सेवा रस्त्याने मुंबईकडे जावे. मुंबई ते सातारा वाहतूक पाषाण रस्त्याने वळवून रॅम्प क्रमांक सहावरुन वारजेकडे वळविण्यात येणार आहे.