scorecardresearch

“घर फोडल्यामुळे भाजपाचा पराभव” म्हणणाऱ्या पटोलेंना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही आमच्या उद्धव ठाकरेंना…”

घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

nana patole uddhav thackrey chandrakant patil
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग कोणी केला, विश्वास घात कोणी केला.

हेही वाचा >>> कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “आज…”

उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहेत. तुम्ही २०१९ ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना, राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसं पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं. आमचं अतिशय गुण्यागोविंदाने चाललं होतं. तुम्ही त्यांना फितवलं, पळवलं, अशा शब्दात नाना पटोले यांना त्यांनी टोला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घर कोणी कोणाची फोडली, गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 13:38 IST
ताज्या बातम्या