पुणे : भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे दौर्‍यावर असताना,पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलताना म्हणाले,उद्या प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत सांगली येथे एका मोठा पक्ष प्रवेश होणार आहे.त्यानंतर दोन तीन दिवसात आणखी काही घटना घडणार आहेत.

या सर्व घटना पाहिल्यावर लोक म्हणतात,तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहे की नाही.पण करणार तर काय साडे चार वर्ष तर सरकार काही जाऊ शकत नाही.हे 235 वाले सरकार आहे.त्यामुळे ज्याला राजकारणात रहायचं आहे.त्याला माहिती आहे की,जे सरकार साडे चार वर्ष राहणार नाही.तर यांचाच शर्ट पकडावा लागेल नाही.तर आपली काम होणार नाहीत,असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.या निमित्ताने राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित आहेत.त्या दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.सांगली येथे एक मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

त्याबाबत हर्षवर्धन सपकाळ विचारले असता ते म्हणाले,काँग्रेस पक्ष हा विचार धारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा पक्ष आहे.काँग्रेस पक्षाजवळ सक्षम आणि समर्थ असे नेतृत्व आहे.तसेच काँग्रेस पक्षातील नेते घेतल्याशिवाय यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरे जाता येत नाही.त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस युक्त भाजप कधी झाली हे त्यांना कळलेच नाही.

मुख्यमंत्र्यांनी जर मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री हे काँग्रेस पक्षातील असल्याचे दिसून येईल,तुम्ही म्हणता एक कोटी कार्यकर्ते आहेत.तर अधिकची लोक का पाहीजे.तुमच्याकडे नरेंद्र मोदी यांच नेतृत्व आहे. ते सक्षम नसल्याने आणि पोकळ झाल्याने आता काँग्रेस पक्षातील नेत्यांना घ्याव लागत असून ही शोकांतिका असल्याचे सांगत भाजप नेतृत्वावर त्यांनी टीका केली.