पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल, पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवमोन्मेष २०२५’ या सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय विभागीय परिषदेचे शुक्रवारी (१३ जून) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सिद्धी बँक्वेट येथे सकाळी साडेनऊ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेत सनदी लेखापाल व्यावसायिकांसाठी करसुधारणा, वित्तीय तयारी, लेखापरीक्षण यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. गिरीश आहुजा, अनिकेत तलाठी, अर्पित जैन, सचिन चितळांगे, यश गोयंका, सुप्रिया बन्सल, निकिता पंजाबी, शेखर साने, अविनाश पोद्दार, मनीष बक्षी, आनंद राठी आणि ललित वलेचा परिषदेतील विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सचिन मिणियार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.