लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह सहाजणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पुण्यातील डॉक्टर आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई

आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रचार करणाऱ्या दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. दोन महिन्यांपूर्वी एनआयएच्या पथकाने पुणे, मुंबई, ठाणे परिसरात कारवाई करुन दहशतवाद्यांना अटक केली होती. पुणे, मुंबईसह देशभरातील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याचा कट आरोपींनी रचल्याचे तपासात उघडकीस आले होते. ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला, लालाभाई शर्जील शेख आकीफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा, डॉ. अदनान अली सरकार यांना दोन महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. एनआयएने गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सहा दहशतवाद्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

आणखी वाचा-प्रभू श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यात घुमणार पिंपरी- चिंचवडचा ‘चौघडा’! वादक पाचंगेंना विशेष निमंत्रण

कोंढवा भागात राहणारा डॉ. सरकार हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात काम करत होता. डॉ. सरकार आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्यात गुंतल्याचे तपासात उघडकीस आले होते. झुल्फिकार अली बडोदावाला आणि आकीफ अतीक नाचन यांनी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.