scorecardresearch

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी तातडीने भूसंपादन आवश्यक आहे. ते झाले तर वाहतूक कोंडी दूर होईल.

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी
पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल. त्यासाठी १३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून काही मार्गांवर काम सुरू असून, निधीसाठी राज्य शासनाबरोबर चर्चा करण्यात येईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. चांदणी चौक येथे भेट देऊन पाहणी करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी तातडीने भूसंपादन आवश्यक आहे. ते झाले तर वाहतूक कोंडी दूर होईल. चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याची कार्यवाही येत्या काही दिवसांत होईल. त्या अनुषंगाने विविध सेवा रस्ते सुरू करण्याचे नियोजित आहे’पुण्यात येणारी वाहतूक जास्त असल्याने पुणे- अहमदनगर- औरंगाबाद महामार्गाचे काम सुरू आहे. पुणे सातारा रस्त्याचे शास्त्रीय पद्धतीने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यात येईल. पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हाय वे ची कामे सुरू झाली आहेत, असेही गडकरी म्हणाले.

हेही वाचा : पुणे : साडेदहा लाखांचा गुटखा जप्त ; खंडणीविरोधी पथकाची कारवाई

पुण्यातही डबल डेकर बससाठी निधी दिला जाईल

मुंबईमध्ये विजेवर चालणारी डबल डेकर बस सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही ही सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्राकडून निधी दिला जाईल. जोड बस आणि ट्रॉली बसचा ही महापालिकांनी विचार करावा, अशी माहिती त्यांनी दिली.
‘नवले ब्रीजवरील अपघात रोखण्यासाठी दीर्घ कायमस्वरूपी उपाययोजनांबरोबरच तात्पुरत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वारजे बावधन वेदभवन सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. चाकण एमआयडीसी परिसरात १५० हेक्टर जागेवर लॉजेस्टिक पार्क प्रस्तावित आहे. अवजड वाहने पुणे शहरात येणार नाहीत, असे गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Circular route will be helpful in traffic congestion at chandni chowk nitin gadkari in pune print news tmb 01

ताज्या बातम्या