लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर केला. एकाच दिवशी दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीआयएससीईने दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल, तर शाळांना त्यांचा एकत्रित निकाल करिअर्स पोर्टलवर पाहता येईल. निकालाबाबतची अधिक माहिती https://cisce.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.