scorecardresearch

Premium

पुणे: जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली.

Clashes over land disputes
जमिनीच्या वादातून टोळक्याने हातात शस्त्रे, बांबू उगारुन परिसरात दहशत माजविली. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.

showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
Nagpurakar Response to artificial lake
‘पुढच्या वर्षी लवकर या’चे साकडे घालत गणरायाला भावपूर्ण निरोप; कृत्रिम तलावाला नागपुराकरांचा प्रतिसाद
Husband commits suicide
“तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
cannabis gram Juna Andura
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड, देवीदास बाळासाहेब गायकवाड, तेजस मल्हारी गायकवाड, गजानन गुलाब गायकवाड, विजय सदाशिव गायकवाड, सोमनाथ उर्फ बाजीराव रामा गायकवाड (सर्व रा. ऊरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे ) यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर अशोक कुटे (वय ३४, रा. कोंढवा ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पुणे: खडकी भागातील वाहतूक कोंडी सुटणार

सागर आणि त्यांचे सासरे संभाजी गायकवाड मोटारीतून नगर रस्ता परिसरातील कोलवडी गावात गेले होते. त्या वेळी जमिनीच्या वादातून टोळक्याने हातात शस्त्रे, बांबू उगारुन परिसरात दहशत माजविली. टोळक्याने सागर आणि सासऱ्यांना शिवीगाळ केली, तसेच सागरवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. सागर यांच्या मोटारीच्या काचा फोडून दोन लाखांची रोकड चोरुन नेली. पुन्हा या परिसरात आला तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clashes over land disputes young man was stabbed with a sharp weapon pune print news rbk 25 mrj

First published on: 07-06-2023 at 13:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×