scorecardresearch

Premium

पुणे: खडकी भागातील वाहतूक कोंडी सुटणार

खडकी येथील दोन भुयारी मार्गांच्या रूंदीकरणामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

Traffic congestion
भुयारी मार्गालगतच्या स्वतंत्र रस्त्याचेही रूंदीकरण महापालिकेकडून करण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: खडकी येथील दोन भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिका रेल्वे प्रशासनाला पंचवीस कोटींचा निधी देणार आहे. रूंदीकरणामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
Inauguration of Panvel Margike on Shilphata flyover by cm eknath shinde traffic on JNPT and Thane route will be reduced
शिळफाटा उड्डाणपुलावरील पनवेल मार्गिकेचे लोकार्पण, जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार
pwd started installation of Road safety sign boards on flyover of ghodbunder road
ठाणे: घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांवर अखेर वाहतुक सुरक्षा घटक
traffic
शहरबात: दापचरी सीमा तपासणी नाक्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

आणखी वाचा-आता काँग्रेसचा मावळवर दावा!

महापालिकेने स्वखर्चाने ही कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. खडकी येथे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गालगत रेल्वे मार्ग आहे. रेल्वे मार्गातील भुयारी मार्गामुळे औंध, बोपोडी, खडकी आणि येरवडा भागातील वाहनचालकांना ये-जा करणे सुलभ होत आहे. मात्र भुयारी मार्गाची रूंदी कमी असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे खडकी पोलीस स्थानक ते खडकी सहाय्यक पोलीस कार्यालयाजवळील भुयारी मार्गांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका रेल्वे प्रसासनाला पंचवीस कोटींचा निधी देणार आहे. भुयारी मार्गालगतच्या स्वतंत्र रस्त्याचेही रूंदीकरण महापालिकेकडून करण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जागा दिली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic congestion in khadki area will be resolved pune print news apk 13 mrj

First published on: 07-06-2023 at 13:40 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×