भाजपने राज्यात घवघवीत यश मिळवले. ही मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आहे. विकास आणि विश्वासाच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजप हा महाराष्ट्र व्यापी पक्ष आहे. भाजपला सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे सेवक म्हणून कार्य करावे. विजयातून अहंकाराची भावना निर्माण झाल्यास आपलीही अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीसारखी होईल, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपला सत्ता परिवर्तनासाठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचे आहे, असे ते या वेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड येथील राज्य कार्यकारिणीच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवरही खरपूस शब्दांत टीका केली. तूर डाळप्रकरणी सरकारवर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. जलयुक्त शिवारमुळे शेती क्षेत्राची सकारात्मक वाढ झाल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस म्हणाले, भाजपने महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. भाजपने या निवडणुकात सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता प्राप्त केली. नागपूरमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे. या वेळी तिथे ६८ जागांवरून पक्षाने १००च्याही पुढे मजल मारली. तिथे सत्तेतून सत्ता प्राप्त केली. तर लातूर सारख्या ठिकाणी जेथे गत निवडणुकीत आम्ही भरपूर प्रचार केला. पण आमचा तिथे नगरसेवक ही नव्हता. तिथे आम्ही सत्ता मिळवली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता मिळवली. हे यश म्हणजे आमचे शून्यातून सत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis advice parties workers in bjps state meeting
First published on: 27-04-2017 at 15:33 IST