पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौर्यावर आले असताना. पुणे पोलिस आयुक्त कार्यालयमध्ये शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून गणेशोत्सव काळात पाच दिवस रात्री १२ पर्यन्त गणेशोत्सव साजरा करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
या बैठकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुणे शहरातील गणेशोत्सवाची चर्चा देशभरात सुरू असते. हा उत्सव पाहण्यास देश विदेशातील नागरीक येत असतात.पण मागील दोन वर्ष करोना महामारीमुळे निर्बंध होती.त्यामुळे आपण सर्वांना हा उत्सव शांततेत साजरा केला.मात्र आज झालेल्या बैठकीत सर्वांच्या भावना लक्षात घेता, गणेशोत्सव काळात पाच दिवस स्पिकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.मात्र त्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये.याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी आणि तुम्ही घेताल,हा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी कार्यकर्ते महापालिकेत परवानगी मागण्यास जातात.त्यावेळी अनेक विभागाकडे जाण्यास सांगतात.पण आता एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानगी एकाच वेळी मिळतील.तर त्यामध्ये प्रामुख्याने आता एकदा परवानगी मागण्यास आल्यावर पुढील पाच वर्षाची परवानगी दिली जावी, मंडप शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, महावितरणकडे लाईट कनेक्शन घेताना,डिपॉझिट द्यावे लागते.मात्र ते पैसे अनेक वर्ष महा वितरणकडे आहे.ते पैसे मंडळांना लवकरात लवकर देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी महावितरणच्या अधिकार्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा,असे त्यांनी सांगितले.