पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.  यावेळी ट्रस्टचे डॉ. बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी आदी उपस्थित होते. दगडूशेठ गणपतीची एकनाथ शिंदे यांनी आरती केली. ट्रस्टतर्फे शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.