महापालिका आयुक्तांना निवेदन सादर

पुणे : नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ठोस व्यवस्था उभारावी, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात असल्याने आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून विक्रम कुमार मंगळवारपासून कामकाज सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर संदीप खर्डेकर यांनी विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.

नगरसेवकांचे अधिकार संपल्याने सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी कोणाशी संपर्क साधावा याबाबतची माहिती विविध माध्यमातून जाहीर करावी.  विशेषत: कचरा, सांडपाणी, विद्युत, पाणीपुरवठा, डास निर्मूलन अशा अनेक विभागांमध्ये नागरिकांची कामे असतात. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात येत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. अनेक वेळा अधिकारी नागरिकांचे फोन घेत नाहीत. त्यामुळे फोन घेण्याबाबतची सूचना अधिकाऱ्यांना द्यावी. करोना संकटकाळात उभारेलल्या वॉर रूम प्रमाणे चोवीस तास कार्यन्वित असलेली यंत्रणा उभारण्यात यावी, असे खर्डेकर यांनी या निवेदनात नमूद केले आहे.