पुणे : शाळेत शिरून शाळेतील शिक्षकांना शिवीगाळ केल्या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येरवड्यातील डॅान बॅास्को स्कूलमध्ये  ही घटना घडली.

या प्रकरणी अजय विश्वनाथ जानराव, प्रकाश बनसोडे, शाम सदाफुले यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत  सुर्यकांत चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शाळेत परवानगी न घेता शिरले. शाळेत बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ सुरू केली. शाळेतील प्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. शिक्षकांच्या अंगावर आरोपी धावून गेले. या घटनेमुळे शिक्षक घाबरले, असे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरवडा भागात गेले ५० वर्ष डॅान बॅास्को शाळा ज्ञानदानाचे काम करत आहे. शाळेत गरजू, कष्टकरी पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येतो. आरोपी अजय जानराव, कथित पत्रकार प्रकाश बनसोडे, शाम सदाफुले यांनी संघटनेच्या नावाखाली मुलांना प्रवेश देण्यासाठी शालेय प्रशासनावर दबाब आणतात, असे डॅान बॅास्को स्कूलचे प्रवक्ते सूर्यकांत चव्हाण यांनी सांगितले.