नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. तिला मिळणारा प्रतिसादही वाढता आहे. या पदयात्रेत नागपूरचे ७१ वर्षीय काँग्रेस निष्ठावंत बाबा शेळके हे पहिल्या दिवसापासून सहभागी झाले असून आतापर्यंत त्यांनी १२०० किमी. पदयात्रा पूर्ण केलीआहे. ते दिवाळीलाही घरी पोहचू शकले नाहीत. ‘मुलांना आणि आप्तस्वकीयांनी ‘बाबा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’ अशी प्रतिक्रिया दिली असून ती समाज माध्यमावर सध्या व्हायरल होत आहे.

बाबा शेळके हे जुने काँग्रेस कार्यकर्ते आहेत. एक वेळा ते नगरसेवकही होते. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी ‘घंटानाद’ ही संघटना स्थापन केली. यामाध्यमातून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांचा मुलगा बंटी हा सुद्धा लढाऊ कांग्रेस कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी आहेत. सुरूवातीपासूनच गांधी विचारावर निष्ठा असणारे बाबा शेळके यांना राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढणार असे कळल्यावर त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ७१ वर्ष वय असून आणि पदयात्रेत थकवा येण्याची भीती असूनही त्याची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष आणि समाजात पसरवण्यात येत असलेले जात-धर्मवादाचे विष याविरुद्ध लढा देण्यासाठी बाबा शेळके कन्याकुमारीला गेले.

हेही वाचा :गडचिरोली : सूरजागड लोहखनिजाविषयी होणाऱ्या जनसुनावणीसाठी प्रशासनाचे दबावतंत्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालत आहेत. आतापर्यंत १२०० किलोमीटरची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली. सध्या ते तेलंगणा राज्यात आहेत.दिवाळीत ते कुटुंबापासून लांबच होते. मोदींनी देशाचे दिवाळे काढले,कसली दिवाळी? मी काश्मीरपर्यंत जाईल. असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा वाणवा आहे. या पार्श्वभू्मीवर बाबा शेळके वयाची पर्वा न करता पक्षाच्या पदयात्रेत सहभागी झाले आहेत . त्यांचे मित्र व चाहत्यांनी याबाबत समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. ‘ बाबा आम्हाला तुमचा अभिमान आहे. ’ असे त्यात नमुद केले आहे