मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत रविवार (४ सप्टेंबर) रामलीला मैदानावर महा रॅली काढण्यात येणार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : वनविभागाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाचा जामीन फेटाळला

सध्याच्या कठीण काळात काँग्रेस जनतेबरोबर आहे आणि राहील.मोदी सरकारची धोरणे विनाशकारी आहेत. गेल्या आठ वर्षांत अशा चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलिंडर, तेल, कडधान्ये यांचे भाव वाढलेले आहेत. महागाईच्या झळा सोसत सण साजरे केले जात आहेत. या बिकट परिस्थितीच्या विरोधात २०२१ च्या जून महिन्यापासून काँग्रेसने देशभरात संसदेपासून अगदी रस्त्यावर आंदोलने करून जनतेचे गाऱ्हाणे मांडून मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीत महारॅली आयोजित केली आहे. भारतभर चाललेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस सातत्याने सहभागी झाली आहे,असे मोहन जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास ,कात्रजमधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोशी म्हणाले की, दिल्लीतील महा रॅली मध्ये महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला जात असून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत, पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलने करुन यापूर्वी सातत्याने निषेध नोंदविला आहे.