काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकर यांनी मंगळवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले होते. कसबा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे निरीक्षक, आमदार संग्राम थोपटे, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी नेत्यांची बुधवारी रात्री दाभेकर यांच्याबरोबर चर्चा झाली होती. या चर्चेवेळी दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली होत. कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय जाहीर करू, असे दाभेकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दाभेकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

हेही वाचा – “या घटनेमागील मास्टर माईंड शोधला पाहिजे”, आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – कसबा, चिंचवडसाठी ‘होऊ दे खर्च’; उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा २८ वरून ४० लाखांवर

दाभेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे, भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात दुरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.